About
विषय प्रवेश : तत्त्वज्ञान, विज्ञान आणि आध्यात्म याला आपण जगण्याची त्रिसूत्री म्हणतो. परंतु तत्त्वज्ञान म्हटले की आपल्याला पौर्वात्य नावे आठवतात आणि विज्ञान किंवा शास्त्रज्ञ म्हटले की आपल्याला पाश्चात्य नावे आठवतात. या पाच ऑडिओबुकच्या मालिकेत १३ पाश्चात्य तत्त्वज्ञ, १० भारतीय शास्त्रज्ञ आणि ५ भारतीय धर्माचार्य अशी एकूण २८ चरीत्रे क्रमशः कथन केली आहेत. या माध्यमातून गेल्या अडीच हजार वर्षांतील तत्त्वज्ञान, विज्ञान आणि अध्यात्माचा रंजक इतिहास आपल्याला कळू शकतो. >> विद्यार्थी, पालक, शिक्षक अशा सर्वांना उपयुक्त सुबोध, रंजक स्वरूपातील ही मालिका आहे. >> यामध्ये पुढील क्रमानुसार ५ भाग आहेत. >> विचारांची शाळा - १ | पाश्चात्य तत्त्वज्ञ - चरित्र ओळख - भाग १ (सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल, झीनो, सेंट ऑगास्टीन, मॅकियावेली) >> विचारांची शाळा - २ | पाश्चात्य तत्त्वज्ञ - चरित्र ओळख - भाग २ (फ्रान्सिस बेकन, गॅलिलिओ, थॉमस हॉब्ज, रने देकार्त, जॉन लॉक, आयझॅक न्यूटन, गॉटफ्रेड लाईबनिझ) >> विचारांची शाळा - ३ | भारतीय शास्त्रज्ञ - चरित्र ओळख - भाग १ (भास्कराचार्य, आर्यभट्ट, महर्षि कणाद, रामानुजन, डॉ. खानखोजे) >> विचारांची शाळा - ४ | भारतीय शास्त्रज्ञ - चरित्र ओळख - भाग २ (बिरबल साहनी, डॉ. जगदीशचंद्र बोस, सी. व्ही. रामन, डॉ. एम् विश्वेश्वरय्या, डॉ. शियाली रंगनाथन) >> विचारांची शाळा - ५ | भारतीय आचार्य - चरित्र ओळख (आचार्य चाणक्य, आद्य शंकराचार्य, मध्वाचार्य, रामानुजाचार्य, आचार्य विद्यारण्य) चला तर मग! ऐकताय ना? ऐकत रहा!
You can also join this program via the mobile app. Go to the app