About
बुद्ध धम्म आणि संघ यांना बौद्ध साहित्यात 'त्रिरत्न' असे म्हटले आहे. भगवान बुद्धाच्या एकूणच शिकवणुकीचे सार या तीन संकल्पनामध्ये सामावले आहे. मार्गदाता बुद्ध, मार्ग धम्म आणि मार्गदर्शक भिक्खुसंघ असे हे त्रिरत्न आहे. >> 'त्रिरत्न चिंतन' या विशेष श्रवण मालिकेत आचार्य धम्मानंद कोसंबी यांची या विषयावरील १० प्रवचने आहेत. >> बुद्ध, धम्म आणि संघ हे शब्द म्हणून आपल्याला माहिती आहेतच. परंतु संकल्पना म्हणून त्यांची उकल काय, स्वरूप काय आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्यांचा उपयोग काय यांचा सोप्या भाषेत विस्तृत परामर्श यामध्ये घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गृहस्थ जीवनात उपासक-उपासिका तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी यांना जीवनावश्यक मूलभूत मार्गदर्शन करणारी धम्माची मूलभूत सूत्रे सविस्तर समजावून सांगितली आहेत. >> या मालिकेत दोन भाग आहेत. पहिल्या भागात बुद्ध, धम्म आणि संघ या संकल्पना समजावून सांगणारी ४ प्रवचने आहेत. दुसऱ्या भागात सिगाल सुत्त, पंचस्कंध, अर्हतपद, निर्वाण, चार आर्यसत्ये आणि आर्य अष्टांगिक मार्ग या विषयांवरील ६ प्रवचने आहेत. >> प्रत्येक रविवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी 'उपोसथ' म्हणजे अष्टशील किंवा दशशील पालन करून दिवसभर धम्म श्रवण, मनन आणि चिंतन करणे. या 'उपोसथ' काळासाठी स्वाध्याय म्हणून ही प्रवचने अत्यंत बोधप्रद आहेत. >>
You can also join this program via the mobile app. Go to the app