About
'शिवकुटुंब' म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुटुंब हे महाराष्ट्राचे आद्य कुटुंब म्हटले तरी वावगे ठरणार नाही. महाराष्ट्राची राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक अस्मिता ही शिवकुटुंबामुळेच आहे. >> आजच्या काळात आपल्या कुटुंबाने शिवकुटुंबाचा अभ्यास करावा यासाठी ही ५ ऑडिओबुक्सची विशेष श्रवण मालिका आहे. या पाच भागात मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे यांच्यापासून ते छत्रपती राजर्षि शाहू महाराजांपर्यंत शिवकुटुंबातील ५ प्रमुख व्यक्तींचा सविस्तर चरित्र अभ्यास आहे. या पाच चारित्रातून सांगितलेला हा महाराष्ट्र धर्माचा इतिहास आहे. तसेच खास बालकिशोर व तरुणांसाठी सांगितलेल्या युद्धकथा आहेत. गड, घोडे, किल्ले, युद्ध, तलवार याच विशिष्ट चौकटीत अडकलेल्या इतिहासाच्या पुढे जाऊन गत इतिहासातून आजच्या काळाशी सुसंगत जीवनमूल्ये कशी शिकता येतील यादृष्टीने ही विशेष श्रवणग्रंथ मालिका सहकुटुंब ऐकावी. यामध्ये पुढील पाच ऑडिओबुक आहेत. १ | छत्रपती शिवाजी महाराज | चरित्र अभ्यास २ | छत्रपती संभाजी महाराज | चरित्र अभ्यास ३ | राजमाता जिजाऊ आणि महाराणी ताराबाई | चरित्र ओळख ४ | शिवरायांच्या युद्धकथा ५ | छत्रपती राजर्षि शाहू महाराज या मालिकेत एकूण ७५ एपिसोड आहेत. एकूण कालावधी सुमारे १५ तास. >> चला तर मग! ऐकताय ना? ऐकत रहा! >>
You can also join this program via the mobile app. Go to the app