About
बुद्ध धम्म आणि संघ यांना बौद्ध साहित्यात 'त्रिरत्न' असे म्हटले आहे. भगवान बुद्धाच्या एकूणच शिकवणुकीचे सार या तीन संकल्पनामध्ये सामावले आहे. मार्गदाता बुद्ध, मार्ग धम्म आणि मार्गदर्शक भिक्खुसंघ असे हे त्रिरत्न आहे. >> 'त्रिरत्न वंदना' या विशेष श्रवण मालिकेत बुद्ध, धम्म आणि संघ यांची मूलभूत तत्त्वे सांगणाऱ्या १२ वंदना आणि १४ सुत्तपाठ मूळ पाली संगायन तसेच मराठी भावार्थासहित पठण केले आहेत. >> यांचे नित्य पठण, श्रवण, मनन व चिंतन करणे प्रत्येक उपासक व उपसिकेसाठी बोधप्रद व लाभप्रद आहे. >> यामध्ये पुढीलप्रमाणे अनुक्रम आहे. >> (पाली-मराठी संगायन) >> भाग १ | त्रिरत्न वंदना (बुद्ध धम्म संघ) >> १. सरणा गमन २. सरणत्तयं (त्रिसरण) ३. पंचसीलानि (पंचशील) ४. बुद्ध वंदना ५. धम्म वंदना ६. संघ वंदना ७. बुद्ध पूजा (पुष्प पूजा, धूप पूजा, बोधि पूजा, संकल्प) ८. रतनत्तय वंदना (त्रिरत्न वंदना) – १ – निर्वाण गती ९. रतनत्तय वंदना (त्रिरत्न वंदना) – २ – काया स्मृती १०. आजीवन एकादश सुचरित सीलं (काया सुचरित, वाचा सुचरित, चित्त सुचरित) ११. काया वाचा मन खमायाचना (काया वाचा मन क्षमायाचना) १२. धम्मध्वज वंदना >> भाग २ | परित्ताण पाठो सुत्त (परित्राण पाठ सुत्त) >> १३. आवाहन सुत्त १४. महामंगल सुत्त १५. रतन सुत्त १६. करणीयमेत्तसुत्त १७. महाजयमंगल गाथा (अभय परित्त) १८. जयमंगल अट्ठगाथा १९. पुण्यानुमोदन २०. धम्मपालन गाथा २१. सब्ब सुखगाथा २२. आशीर्वाद गाथा २३. व्यंग्धपज्ज सुत्त (धनसंपत्ती कशी प्राप्त करावी?) २४. सिगालोवाद सुत्त (सांसारिक माणसाची आचारसंहिता) २५. मेत्ता भावना (मैत्री भावना) २६. आदेश >> या सर्व वंदना एकांतात अथवा सहकुटुंब, सहपरिवार ऐकाव्यात, पाठ कराव्यात, पठण कराव्यात, अर्थ जाणून घ्यावा आणि चिंतन, मनन करावे. प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी 'उपोसथ' म्हणजे दशशील पालन आणि धम्म श्रवण मनन चिंतन परिपाठ करणे प्रत्येक उपासक आणि उपसिकेच्या हिताचे आहे. >> भवतु सब्ब मंगलं! >> ऐकताय ना? ऐकत रहा! >>
You can also join this program via the mobile app. Go to the app